Author Topic: ------ तू नि प्रेम तुझं -----  (Read 1365 times)

Offline SHASHIKANT SHANDILE

  • Jr. Member
  • **
  • Posts: 349
  • Gender: Male
  • शशिकांत शांडिले, नागपुर
------ तू नि प्रेम तुझं -----
« on: March 04, 2015, 11:19:50 AM »
तुझे रुप गुलाबावानी रंग होळीचे बहरूनी
तुझ्या हाताची मेहंदी लाल लाल हि रंगुनी
नाचे अंगणभर तू होऊनी सुंदर मोहिनी
लाली ओठांची गुलाबी  मन माझे ती मोहिती

तू  कोण आहे माझी तुला कसे काय सांगू
जगण्याला जे हवी  ती श्वास वाटते तू
मी जीवनाच्या अंती तुला ठेवीन सांभाळूणं 
एकटाच मी जगीणं तुह्या आठवणं जपूणं 

तुझं लाजुनीया  हसणं तुझं गोळ गोळ बोलणं 
मला वेळ लावतोया तुझं तिरप्या नजरेनं बघणं
तुला जेव्हाही बघतो तू लागे गोऱ्या चंद्रावानी   
तुझ्या कपाळाचा कुंकू माझ्या प्रेमाची  निशाणी

शशिकांत शांडीले (S D), नागपूर
(MO. ९९७५९९५४५०)
Its Just My Word's

शब्द माझे!

Marathi Kavita : मराठी कविता