Author Topic: माझ्या मनाचा आरसा  (Read 1528 times)

Offline kshitij samarpan

  • Newbie
  • *
  • Posts: 9
माझ्या मनाचा आरसा
« on: March 05, 2015, 12:29:12 AM »
माझ्या मनाचा आरसा ,
कधी पाहशील तू?
त्यात गीत तुझे असतील ,
मिठीत माझ्या गुण गुणलेले तू,,,,,

माझ्या मनाचा आरसा ,
जरी पाहशील तु ,
प्रतिबिंब तुझे पाहुन ,
माझीच आहेस हे ओळखशील तु …

माझ्या मनाचा आरसा ,
त्यात   निखळ पाण्याचा झरा तु ,….
सुरवात तुझी हृदयात माझ्या ,
नसा  नसात विरून जाशील का तू?

माझ्या मनाचा आरसा ,
तुला शोधून काढेलच , …
नजरा  चोरून मला टाळून  जाशील तु ,
तेव्हाही  सावली तुझी,  माझीच असल्याचे अनुभवशील तु ……


क्षितीज समर्पण

Marathi Kavita : मराठी कविता

माझ्या मनाचा आरसा
« on: March 05, 2015, 12:29:12 AM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

n deshmukh

  • Guest
Re: माझ्या मनाचा आरसा
« Reply #1 on: March 17, 2015, 12:12:28 PM »
माझ्या मनाचा आरसा तुला शोधून काढेलच...nice one...

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):