Author Topic: शब्द जरी माझे असले...  (Read 2150 times)

Offline hrishi gaikwad

 • Newbie
 • *
 • Posts: 35
 • Gender: Male
 • अनुभवातून सर्व कही शिकता येते...
  • hrishigaikwad.blogspot.in
शब्द जरी माझे असले...
« on: March 08, 2015, 04:29:08 PM »
शब्द जरी माझे असले
तरी स्वर मात्र तूच आहेस
धून जरी माज़ी असली
तरी गीत मात्र तूच आहेस

डोळे जरी माझे असले
तरी त्यांत ओढ़ मात्र तूजीच् आहे
ओठ जरी माझे असले
तरी बोल मात्र तुझेच आहे

मन जरी माझे असले
तरी त्याची चाहूल मात्र तूच आहेस
ह्रदय असुदेत की माझे
पण त्यांतली स्पंदने मात्र तूजीच आहेत

स्वप्न जरी माझे असले
तरी स्वप्नांमधे फ़क्त तूच आहेस
जीवन जरी माझे असले
तरी श्वास मात्र तूच आहेस
 
भास जरी असला
तरी आस मात्र तूच आहेस
ह्या अनोळखी वाटेचा
सख्या तूच एक साथीदार आहेस

प्रवास जरी माझ। असला
तरी वाट मात्र तूच आहेस
ह्या दुखःच्या कढाक्यात
सजना तूच एक सावली आहेस

भावना जरी माझ्या असल्या
तरी जाणीव मात्र तूच आहेस
प्रेम म्हणजे काय ठाऊक नाही
माझ्यासाठी तर सर्वकाही तूच आहेस

मी कुठे स्वतःची राहिली आहे
मी तर फ़क्त तूजीच झ।ली आहे
मी कुठे मझ्यात उरली आहे
मी तर केव्हानाच तुझ्यात सामवली आहे....
« Last Edit: March 08, 2015, 09:26:17 PM by hrishigaikawd418@gmail.co »

Marathi Kavita : मराठी कविता


gajanan chopade

 • Guest
Re: शब्द जरी माझे असले...
« Reply #1 on: March 15, 2015, 02:40:07 PM »
मनाल लागली मनात हलचल करुण गेली  हि कविता

Offline hrishi gaikwad

 • Newbie
 • *
 • Posts: 35
 • Gender: Male
 • अनुभवातून सर्व कही शिकता येते...
  • hrishigaikwad.blogspot.in
Re: शब्द जरी माझे असले...
« Reply #2 on: March 15, 2015, 07:47:00 PM »
धन्यवाद्
« Last Edit: March 21, 2015, 01:25:06 AM by hrishigaikawd418@gmail.co »