Author Topic: रंगात सावळ्या तुझ्या  (Read 1199 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
रंगात सावळ्या तुझ्या
« on: March 09, 2015, 09:35:42 PM »
रंगात सावळ्या तुझ्या
भिजायचे होते मला
डोळ्यात काजळलेल्या 
निवायाचे होते मला

तू कृपेची बरसात
तू सुखाची रुजवात
असे स्वप्न देखणे मी
पाहिले ना जीवनात

गाईलेल्या गाण्यात या
पाहिले कितीदा तुला
मांडलेल्या ओळीत या
सजविले सदा तुला 

शोधतांना जन्म गेला
कवडसे काही जरी
आणि त्या हासण्याचा
भास खुळखुळे उरी

विक्रांत प्रभाकर
 
« Last Edit: March 10, 2015, 04:05:16 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता