Author Topic: ...तरीसुद्धा ह्या जगात...  (Read 935 times)

Offline hrishi gaikwad

 • Newbie
 • *
 • Posts: 35
 • Gender: Male
 • अनुभवातून सर्व कही शिकता येते...
  • hrishigaikwad.blogspot.in
...तरीसुद्धा ह्या जगात...
« on: March 14, 2015, 06:07:49 PM »
आईच्या पोटी जन्माला येते
बापाच्या अंगा खांद्यावर वाढते
आईच्या कुशीत तिला गाढ़ ज़ोप लागते
बापाच्या मिठीत सुरक्षित वाटते

तरीसुद्धा ह्या जगात कुणी कुणाचे नसते....

घरातली धाकटि पोर
थोरल्या भावांच्या लाडकि असते
खूप विश्वासाने बहिण भावाला राखी बांधते
तिच्या सुरक्षिततेची हमी भावाकडे असते

तरिसुद्धा ह्या जगात कुणी कुणाचे नसते...

पोरगी म्हणजे परक्याचे धन
लग्न करून सासरि जाते
हक्काच् कुणीतरी तिला मिळालेले असते
नविन घराशी नाते जोडले जाते

तरिसुद्धा ह्या जगात कुणी कुणाचे नसते...

आईवाणी सासू तिची
दूश्मना वाणी छळ करते
नवरयाच्याच् घरात
ती कैदया सारखे  जगते

खरच ह्या जगात कुणी कुणाचे नसते...

मुंगी गत संसार ती
कणा कणाने जोड़ते
सुगरनीचा खोपा तिचा
विहिरिवर उभारते

तरिसुद्धा ह्या जगात कुणी कुणाचे नसते...

पोटची पोर परक्या सारखी वागतात
बाईचाच जन्म तिचा
सगळे काही सहन करते
नवरयासोबत पोरांच्या ही छळाला तोंड देते

खरच ह्या जगात कुणी कुणाचे नसते...

बापाच्या इब्रती पाइ
स्वतःची स्वप्ने मागे सारते
नवरयाच्या सुखासाठी
तिच्या इच्छान ना आवर घालते

स्वतःच्या तोंडातला घास
तिच्या लेकरां ना खाउ घालते
पोटाला चिमटा काढून
तिची चिल्ली पिल्ली मोठी करते

तरिसुद्धा ह्या जगात कुणी कुणाचे नसते...

कसलीच अपेक्षा न ठेवता
ती फ़क्त देत जाते
फुलांचा सुगंध ती
सभोवताली दरवळवते

सगळे काही तीचेच असून
का तिचे काहीच नसते
मुलगी बहिण बायको आई
च्या भूमिकेत ती सगल्यांचीच मने जपते

मग तरिसुद्धा का ?
आयुष्याच्या शेवट पर्यंत
कुणीच तीचे नसते.....


Marathi Kavita : मराठी कविता


Rajshri kahate

 • Guest
Re: ...तरीसुद्धा ह्या जगात...
« Reply #1 on: March 14, 2015, 07:43:08 PM »
very nice....

Offline hrishi gaikwad

 • Newbie
 • *
 • Posts: 35
 • Gender: Male
 • अनुभवातून सर्व कही शिकता येते...
  • hrishigaikwad.blogspot.in
Re: ...तरीसुद्धा ह्या जगात...
« Reply #2 on: March 14, 2015, 09:41:29 PM »
ध्यन्यवाद