Author Topic: तूच......माझा श्वास ही ध्यास ही....  (Read 1424 times)

Offline hrishi gaikwad

  • Newbie
  • *
  • Posts: 35
  • Gender: Male
  • अनुभवातून सर्व कही शिकता येते...
    • hrishigaikwad.blogspot.in
तूच तू मनी
तूच अंतरी
माझा श्वास ही
तू ध्यास ही....

तुजीच् का चाहूल ही वेड्या मनी लागते
तुजीच् का ओढ़ ही हृदयी मला भासते...

तूच तू मनी
तूच अंतरी
माझे स्वप्न ही तू
भास् ही...

तुझ्यासवे का मला फिरावेसे वाटते
तुझ्यासवे रे का मला भिजावेसे वाटते...

तूच तू मनी
तूच अंतरी
माझे प्रेम तू
तूच स्पंदनी.....

तुझ्या कुशीत का मला यावेसे वाटते
तुझ्याच का मिठीत रे निजावेसे वाटते...

तूच तू मनी
तूच अंतरी
माझा प्राण तू
तू आस ही.....

तुजीच् वाट का पाहते ही कावरी ही बावरी
ही वाट ही का संपते तुज़ियाच् या वळणावरि...

तूच तू मनी
तूच अंतरी...
« Last Edit: March 20, 2015, 01:34:00 PM by hrishigaikawd418@gmail.co »

Marathi Kavita : मराठी कविता


रेखा

  • Guest

तुजीच् वाट का पाहते ही कावरी ही बावरी


असे मी मदनाचा पुतळा, काय माझा इलाज त्यावरी?

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):