Author Topic: तुझ्या माझ्या पावलांचे ठसे...  (Read 1210 times)

Offline hrishi gaikwad

  • Newbie
  • *
  • Posts: 35
  • Gender: Male
  • अनुभवातून सर्व कही शिकता येते...
    • hrishigaikwad.blogspot.in
क्षितिजाआड़ मावळलेला सूर्य
ती लाल धुंद संध्याकाळ
वेडीपीसी समुद्राची लाट
आसमंतात पसरलेला पाण्याचा खळखळाट...

तुझ्या माझ्या पावलांचे ठसे
सोबतीला हा समुद्र किनारा
मातीतील जानवनारा ओलावा
अन जिकडे तिकडे चिखल सारा...

हातात तुझ। हात
अन तू मारलेली ती पहिली वहिली मिठी
हृदयात फ़क्त तुजीच् प्रीती
तुला गमावयाची ह्या वेडा मना भीति...

पाहता पाहता सरू लागलेली संध्याकाळ
हवेतला तो थंडगार गारवा
तू जवळ असल्याची जाणीव
अन तुझ्या स्पर्शाने अंगावर येणारा शहारा....

आकाशी आता चंद्र देखील आला
पांढरे शुभ्र चांदनेहि होते त्याच्या सोबतीला
सजना तुझ्यासमोर ते चांदनेहि फिके वाटले
अन तो चंद्र देखील ढगाआडून लाजू लागला...

मनापासून प्रेम तुझ्यावर
प्रेम रंग निसर्गात पसरलेला
तुझ्या माझ्या अमर प्रेमाला
ही अर्धी ओली रात्र देखील सोबतीला...

Marathi Kavita : मराठी कविता


श्याम

  • Guest

अन तू मारलेली ती पहिली वहिली मिठी

न मिटती है मन मे मेरे याद उस मिठी की मिठी मिठी