Author Topic: नको हे प्रेम - राजेश कामत  (Read 1042 times)

Offline Rajesh Kamath

  • Newbie
  • *
  • Posts: 6
ना तुझी तू राहिलीस,
ना राहिलो मी माझा.
हीच आहे तुझी-माझी
प्रेम केल्याची सजा.

जर तुझ्या भावनांची राख झाली,
तर मी ही कुठे वाचलो?
आगोदर मंदिरात बागडायचो,
आज बार मध्ये नाचलो.

जर तुझे अश्रु सुकले,
तर माझे ही सुकले हे शरीर.
तुझी स्थिती नाजुक असेल,
तर माझी ही आहे गंभीर.

जर प्रेमाचा तुला वीट आला,
तर मलाही झाला प्रचंड त्रास.
जर तुला दम लागला,
तर माझा ही कोंडला श्वास.

नाही कोणतीही अपेक्षा आता,
जे होईल ते बघू.
तू तुझे आयुष्य अन मी माझे जीवन,
दोघे सुखाने जगू.