Author Topic: मनातल्या मनात...  (Read 1335 times)

Offline hrishi gaikwad

  • Newbie
  • *
  • Posts: 35
  • Gender: Male
  • अनुभवातून सर्व कही शिकता येते...
    • hrishigaikwad.blogspot.in
मनातल्या मनात...
« on: March 28, 2015, 09:57:35 PM »
मनातल्या मनात
मनाला का कोसत आहेस..

का डोळ्यांतल्या डोळ्यात
अश्रु आटवत आहेस...

हृदयातल्या भावना
हृदयातल्या हृदयात का साठवत आहेस...

का ओठांतले शब्द
ओठातच आडवत आहेस...

का तुझ्यातली तू
कुठेतरी शोधत आहेस...

न केलेल्या चुकांची शिक्षा
का तू भोगत आहेस...

चुकून झ।लेली चूक
सगळ्यां ना माफ़ असते...

मग का तू
स्वतःवर एवढी रुसलिय..

प्रेमात असून तू
का प्रेमालाच मुकलिय...


Marathi Kavita : मराठी कविता