पाठलाग निरागस स्वप्नांचा
स्वप्नांतिल सुंदर परीचा...
पाठलाग तिच्या सावलीचा
तिच्या चाहुलीचा...
पाठलाग तिच्या दिल् चीर अदेचा
घायाळ करणाऱ्या तिच्या नजरेचा...
पाठलाग तिच्या हसन्याचा
तिच्या नकळत लाजन्याचा...
पाठलाग तिच्या पावलांचा
छम छम करणाऱ्या पैंजनांचा...
पाठलाग तिच्या मासूम चुकांचा
तिच्यातल्या बालपणाचा...
पाठलाग तिच्या मनाचा
मनातल्या निर्मळ भावनांचा...
पाठलाग तिच्या जीवनाचा
जीवनातील जानिवांचा...
पाठलाग तिच्या प्रेमळ हृदयाचा
हृदयातील प्रेमाचा...