Author Topic: आंबे आले झाडाला..........  (Read 771 times)

Offline avighanav

  • Newbie
  • *
  • Posts: 2
आंबे आले झाडाला..........
« on: April 08, 2015, 08:42:10 AM »
आंबे आले झाडाला
प्रेम झालेच नाही मला
परिक्षा संपली,सुट्टी सुरू झाली
मात्र प्रेमाचीवेळ नाही आली

आंबे आले झाडाला
दोन हप्ते  झाले सुट्टीला
पण प्रेम झालेच नाही मला
वाटेवरी फिरतो रात्रंदिणी
पण मनात रूजले नाही कूणी

आंबे आले झाडाला
हा हा प्रेम झाले हो मला
को जाणे कोणी माझ्या मनात रूजले
आयुष्यात माझ्या आनंदी क्षण उमटले

आंबे आले झाडाला
प्रपोज केला मी तिला
दोन हप्ते घेतले तिने उत्तराला
हो म्हणाली ती मला
रात्रंदिनी वाटेवरी तिझ्या मी फिरलो
प्रेमामधे मी अपार बुडलो

आंबे आले झाडाला
नजर लागली प्रेमाला
ब्रेकअप झाले आमचे
वाटले आयुष्य जणु दुखी क्षणांचेे

आंबे पडले आलेले  झाडाला
सुट्टी संपली आम्हाला
मित्र मिळाले मला
कधीच विसरलो मी प्रेमाला
-------------------------------------------------------------
रोशन कदम(अविघ्नव)

Marathi Kavita : मराठी कविता