Author Topic: लेका तोह्या सुखा साठी...  (Read 423 times)

Offline Rohi.. fakt tujhya sathi...

  • Newbie
  • *
  • Posts: 5
लेका तोह्या सुखा साठी...
« on: April 08, 2015, 05:34:40 PM »
तोहया साठी लेका
 वात म्हणनुन जळुन रहिलो
तूले मात्र प्रकाश
काळा अंधार गिळून रहिलो

बाप म्हणुनी कर्तव्याची
जाणीव मले हाय
सुखा साठी तोहया
कमी पडणार न्हाय

कोपरी मह्या संसारची
तिले गरीबीचे भोक
तोह्या मात्र सूखा साठी
भिजविल माझ डोकं

उन्हा तन्हात राबुनी
करिन पै पै गोला
भोळ्यां बापाच्या ह्या डोळा
तोह्या सपनचा मळा

आशा मले फ़क्त
तोह्या सुखाचीच हाय
क्षणीक मह्या दुःखाले
म्या घाबरत न्हाय

सुखा साठी तोह्या
कमी पडणार
बाप म्हणुनी माहे
कर्त्तव्य करणार हाय...
created by Rohi...

Marathi Kavita : मराठी कविता