Author Topic: माहित नाही तू जवळ असल्याचा इतका भास का होतो …  (Read 2252 times)

Offline prasad gawand

  • Newbie
  • *
  • Posts: 17
  • Gender: Male
माहित नाही
तू जवळ असल्याचा इतका भास का होतो …


जेव्हा माझे हृदयाचे ठोके वाढतात
तेव्हा बोलत असतात  तुझे ओंठ शांतपणे…
जेव्हा थंड हवेत पण श्वासाची  गरम झळ येते
तेव्हा तुझे डोळे साद घालत असतात  निवांतपणे…. 

जेव्हा तुझा चेहरा अभिप्राय घेवून येतो
तेव्हा तुझें चित्र डोळ्यात पोहत असतात ….
जेव्हा तो निष्पाप प्रश्न घेवून येतो
तेव्हा मला भिंतीवरचे आरसे सुधा बघत असतात…

तुला कोणताच वचन दिला नाही मी
मग मी तुझी वाट का पाहत असतो …
अनावश्यकपणे संमती मिळाल्यावर
हा हृदय खूप अस्वस्थ का असतो……

माहित नाही
तू जवळ असल्याचा इतका भास का होतो …

 - प्रसाद गावंड