Author Topic: नशा  (Read 736 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,258
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
नशा
« on: April 13, 2015, 03:49:29 PM »
नशा
 
तुझी कविता मला आवडते
खुपदा तीच असं म्हणायची,
कधी लाडाने कधी हट्टाने
वाचुन कौतुक ती हसायची !

खुप दिवस चाललं असं
सवय लागली मला लिहायची,
कसली नशा? कशी धुंदी?
लिहीताना मात्र मला चढायची !

अजुनही नशा नाही गेली
प्रेम तेंव्हा, आता विरहाची,
गेली ती केंव्हाच दूरदेशी
नशा कधी ही उतरायची?

आवडत होती कविता तीला
तीच हे कायम म्हणायची,
सोडून आठवणी ती गेली
मी कविता का लिहायची?


© शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता