Author Topic: तुझे रुसने......  (Read 1467 times)

तुझे रुसने......
« on: April 14, 2015, 09:00:14 PM »
हसतच कुणीतरी भेटत असतं,
नकळत आपल्यापेक्षाही आपलसं वाटत असतं, केंव्हा कोण जाणे मनात घर करुन राहत असतं, ते जोपर्यंत जवळ आहे त्याला फूलासारखं जपायचं असतं,
दूर गेल्यावरही आठवण   मनात साठवायचं असतं,
याचचं तर नाव  प्रेम असं असत.
हेच प्रेम एकमेकांवर जिवापाड करायचं असतं,
हृदयातल्या कप्प्यात साठवून ठेवायचं असतं ,
एकमेकांवर रागवायचं नसतं फ़क्त रुसुन         बसायचं असतं ,
रुसता रुसता त्याला ( प्रियकर ) माफ ही करायचं असतं , 
आणि अलगद आपल्या कुशीत जवळ करायचं असतं.....       
                                         :-    निलेश जवादे :'( :)

Marathi Kavita : मराठी कविता