Author Topic: याद तुझी येता प्रिये …  (Read 1282 times)

Offline djyashwante

  • Newbie
  • *
  • Posts: 4
याद तुझी येता प्रिये …
« on: April 16, 2015, 01:44:16 PM »
याद तुझी येता प्रिये …
मन मोहरून गेले,

विसरलो मी मलाच
तुज विसरणे कठीण झाले !

वसंत प्रितीचा बहरता …
नभही भरुनी आले,

आठवणी बरसल्या अश्या
ह्रदय ओलेचिंब झाले !

शब्द शब्द वेचतना...
प्रेमबंध हे जुळे,

दरवळे प्रेमगंध हा
अबोल प्रीत फुले !

याद तुझी येता प्रिये …

..........कवी - दिपक यशवंते  "मैत्रेय"....

Marathi Kavita : मराठी कविता