Author Topic: कधी मज़ वाटे  (Read 1227 times)

Offline Ashish Patil

  • Newbie
  • *
  • Posts: 10
कधी मज़ वाटे
« on: April 18, 2015, 01:48:59 PM »
कधी मज़ वाटे होऊन वारा
भटकावे क्षणभर अदृश्यं
कधी मज़ वाटे होऊन धारा
करु अलगद ओठांना स्पर्श
कधी मज़ वाटे होऊन झुळूकं
ते अलहड केश सावरावे
कधी मज़ वाटे होऊन विनोदं
त्या पापणीत अश्रृ रोखावे
कधी मज़ वाटे होऊन स्वप्नं
त्या निद्रेला गोड बनवावे
कधी मज़ वाटे होऊन प्रातः
त्या नेत्रांना अलगद उघडावे
कधी मज़ वाटे होऊन पुष्पं
करावे सूंदर ते आयुष्यं
कधी मज़ वाटे होऊन वारा
भटकावे क्षणभर अदृश्य

Marathi Kavita : मराठी कविता