Author Topic: म्हणून मी तिच्यावर प्रेम करतो...  (Read 2145 times)

Offline सुमित

  • Newbie
  • *
  • Posts: 25
म्हणून मी तिच्यावर प्रेम करतो०००

म्हणून मी तिच्यावर प्रेम करतो०००
दिसायला नाही ति सुंदर एवढी
तरि स्वत:ला सजवते ति केवढी
तिच्या लाजण्यावर मी भाळतो
म्हणून मी तिच्यावर प्रेम करतो०००

उगीच रागाच सोंग आणते ती कधी कधी
तरि स्वत:ला मवाळ ठेवते ती कधी कधी
तीच्या रागावण्यावर मी हसतो
म्हणून मी तिच्यावर प्रेम करतो००० 

मी मुर्ख आहे माहित आहे मला
फरक ह्याचा कधीच पडला नाही तिला
वेडेपणावर माझ्या हसण्याचा तिला बहाणा मिळतो
म्हणून मी तिच्यावर प्रेम करतो००० 

मि ओरडल्यावर राग तिचा अनावर
मि ओसरिवर अन् ति किचनवट्यावर
भरुन येतो उर अन् अश्रु तिच्या गालावर
चुकलं ग माझं म्हणून तिला मी समजावतो
म्हणून मी तिच्यावर प्रेम करतो००० 

सांजेला नजरांनिच एकमेकांशी बोलतो
इशार्यानिच एकमेकाना खुणावतो
आत आणि बाहेर भावनांना अगदी पुर येतो
म्हणून मी तिच्यावर प्रेम करतो०००

सुमित -9867686957