Author Topic: ओढ  (Read 1612 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
ओढ
« on: April 21, 2015, 08:58:48 PM »
मनाला मनाची कितीओढ आहे
बघ ना...प्रेम किती गोड आहे !

उमलली कळी तरच फूल होते
अपूर्णांची सदा इथे रडारड आहे !

प्रेम दोन मने जोडते म्हणतात
नीट बघ...हल्ली फक्त तडजोड आहे !

आपले ते प्रेम,दुस-यांचे ते लफडे
कीड लागलेली ही जुनीच खोड आहे !

तू निश्चिंत रहा...कुणीही बदलणार नाही
प्रेमात सगळ्यांचीच कुतरओढ आहे !

*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता


जय

  • Guest
Re: ओढ
« Reply #1 on: April 27, 2015, 09:02:04 AM »
प्रेमात सगळ्यांचीच कुतरओढ आहे
कुतरओढ - दोन कुत्रे एका फांदीची दोन टोके ओढतात तशी