Author Topic: तुझ्याच नावे काळीजमहाल माझा...  (Read 964 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
ना रुसवा...ना कसला दुरावा आहे
म्हणतील कुणी हा माझा कावा आहे !

तुझ्याच नावे काळीजमहाल माझा
अजून कसला हवा पुरावा आहे !

रुसल्या नसा जरी,तरी पर्वा नाही
तुझ्या अस्तित्वाचाच त्यांना हेवा आहे !

विचारु का कुणाला मी व्याख्या प्रेमाची?
चोहीकडे नुसताच दिखावा आहे !

जी हालत माझी,तीच तुझी आहे
अत्त्युच्च प्रेमाचाच हा सुगावा आहे !

*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
एक गुणिले दहा किती ? (answer in English number):