Author Topic: प्रेम...फक्त प्रेम  (Read 3240 times)

Offline Anil S.Raut

 • Jr. Member
 • **
 • Posts: 205
प्रेम...फक्त प्रेम
« on: April 28, 2015, 12:02:25 AM »
आलो तुझ्या दारी जरी,भीकेत प्रेम मागणार नाही...
केलीस  हालत तू माझी अशी,तरी मी हरणार नाही !

जेवढे देता आले तेवढे प्रेम तू दिलेस मनोभावे
संसारास तुझ्या आता मी,दृष्ट माझी  लावणार नाही !

आहेत `वीर´ इथेही, प्रेमासाठी चेहरे जाळणारे
जळाले ह्रदय माझे तरी धग तुला मी देणार नाही !

म्हणतील मला `बिनकामाचा´, हे वासनेचे पुजारी
भुलून पोकळ शब्दांना त्या,आगळीक करणार नाही !

सुटले धैर्य मनाचे अन् थांबला श्वास विरहाने
तरी ,कलंक तुझ्या-माझ्या प्रेमाला,लावून जाणार नाही !

*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता


Nilesh Chavan

 • Guest
Re: प्रेम...फक्त प्रेम
« Reply #1 on: May 07, 2015, 11:26:24 AM »
mast.. :)

Offline शितल

 • Jr. Member
 • **
 • Posts: 137
 • Gender: Female
 • हळुवार जपल्या त्या भावना….
Re: प्रेम...फक्त प्रेम
« Reply #2 on: May 12, 2015, 02:48:47 PM »
apratim kavita.....

Offline Anil S.Raut

 • Jr. Member
 • **
 • Posts: 205
Re: प्रेम...फक्त प्रेम
« Reply #3 on: May 12, 2015, 09:31:34 PM »
निलेशजी आणि शितलजी
मनापासुन आभार

Krushna Sathe

 • Guest
Re: प्रेम...फक्त प्रेम
« Reply #4 on: March 31, 2016, 01:19:04 PM »
प्रेम होते तिच्या वर तीने कधी सुईकार केलेच नाहि मन होते तिच्यात तीने ओळख लेच नाही