Author Topic: तुझीच आठवण  (Read 1668 times)

Offline krishnabadime

  • Newbie
  • *
  • Posts: 1
तुझीच आठवण
« on: May 01, 2015, 09:54:52 PM »
असंच चालताना तिच्या हाताशी खेळताना..
आठवतो मला माझ्या आठवणीतला किनारा..!!!

गार वाऱ्याची झुळूक तिचे कुंतल उडवून वाहताना ..
फुलपाखरे रंगबेरंगी गर मधाचा टिपताना ....!!!!

तिच्या गुलाबी गालावरती सुरेख खळी पसरताना ...
पाकळी सारख्या ओठान्तुनी तिची हाक ऐकताना...!!!

गर्द निळ्या आकाशातून पक्ष्यांचा थवा उडताना...
तुझ्या जवळ बसून त्यांना मोजताना....!!!

गर्द अंधारात इवलीशी चांदणी चमकताना...
तो चंद्र आणि चांदणी खेळ लपंडावाचा खेळताना....!!

तुझीच आठवण येते प्रिये ..
क्षणोक्षणी हे जीवन जगताना...!!!

शब्दांच्या पलीकडे मनाशी बोलताना.....
फुलणाऱ्या कळी वाऱ्यावर डोलताना ...!!!

सर्व काही विसरल्यासारख होत....
पापण्या असूनही तो अश्रू पोरका झाल्यासारखं वाटत...!!! :(
                --कृष्णा बदिमे (Krishna Badime)

Marathi Kavita : मराठी कविता


Arvind. k

  • Guest
Re: तुझीच आठवण
« Reply #1 on: May 01, 2015, 10:23:37 PM »
Very nice. In the last stanza you defeate readers expectancy. Really nice creativity and nice line.