Author Topic: दोन थेंब तुझ्या अश्रूूंचे....  (Read 1046 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
****दोन थेंब तुझ्या अश्रूंचे...****

ह्रदयास या किती बोचून गेल्या तुझ्या आठवणी
कळ लागते ह्रदयाला अन् डोळे गाळतात पाणी !

सहवासानेच तुझ्या गंधीत झाल्या  ज्या फूलबागा
आज दवात न्हाल्या की, अश्रू ढाळते पाकळपापणी !

रमवू कशात मन,सारेच कसे भकास इथे ?
व्याकुळ मी चातक, भरीस कोकीळेची आर्त विराणी !

जगण्याला अर्थच कुठे उरलाय आता,सांग ना...
रातंदिस तुझ्या आठवणींनी,जीव लागला झुरणी !

तरून जाईन या विरहसागरातही अलगद
फक्त साथीला दे दोन थेंब तुझ्या अश्रूंचे पाठवूनी !

*अनिल सा.राऊत*
9890884228