Author Topic: का असं कधी वागला नाही तो…….?  (Read 1274 times)

Offline शितल

 • Jr. Member
 • **
 • Posts: 137
 • Gender: Female
 • हळुवार जपल्या त्या भावना….
का असं कधी वागला नाही तो…….?

प्रेमाने एक नझर पाहिलंच नाही
लाजुन नजर झुकावी असं काही बोल्लाच नाही
मीच देऊन बसले हृदय त्याला
धडकाव ह्रदय त्याचही असं कधी वागलाच नाही तो…….

स्वप्नांच्या  जगात कधी शिरला नाही
मला घेऊन सोबत कधी जगला नाही
मीच बेहोश राहीली स्वप्नात त्याच्या
पडावीत माझीही स्वप्नं त्याला असं कधी वागलाच  नाही तो…….

प्रेमाच्या या रंगात कधी रंगलाच नाही
हद्द पार करून प्रेमात कधी पडलाच नाही
मीच तडपली प्रेमाला त्याच्या
गच्च मीठी मारावी त्याला असं कधी वागलाच नाही तो……

विरहाच्या भितीने रात्र-रात्र जागला नाही
प्रितीची प्रीत कधी समजलाच नाही
मीच हरवून बसले त्याच्यात स्वताला
विसरता येईल त्याला असही कधी वागला नाही तो……


…शितल …।[/size]


Marathi Kavita : मराठी कविता


Offline SHASHIKANT SHANDILE

 • Jr. Member
 • **
 • Posts: 271
 • Gender: Male
 • SD
very nice......... :)

Offline सतिश

 • Jr. Member
 • **
 • Posts: 127
 • Gender: Male
सुंदर..

Offline विक्रांत

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,385
good ..expecting more

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,377
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
विसरता येईल त्याला असही कधी वागला नाही तो…… छान... :) :) :)

Offline शितल

 • Jr. Member
 • **
 • Posts: 137
 • Gender: Female
 • हळुवार जपल्या त्या भावना….
 :) thank you....

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा आठ  किती ? (answer in English number):