Author Topic: प्रेम : ऐक ना..तू इतकी चांगली नको वागूस.  (Read 1591 times)

Offline Prem Mandale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
प्रेम : ऐक ना..तू इतकी चांगली नको वागूस
सगळ्यांशी.

सरू :अरे पण मी काय केलेय आता? मी तर एकदम
साधी वागतेय.

प्रेम : तेच तर ना.....
"सामान्य रहाणं हिच एक असामान्य गोष्ट
आहे...आणि तितकीच कठीण नि वाईट आहे"
तू जितकी चांगली वागशील ना तितका तू स्वत:वर
अन्याय करून घेतेयंस.
अपेक्षा वाढतात गं सगळ्यांच्या आपल्याकडून.....
आणि त्या आपण पूर्ण नाही करू शकलो ना तर
दोष आपल्याकडे येतो.
चूक जगाची नसते.....
"लोकांनी आपल्याकडून काय अपेक्षा करावी हे
आपणच आपल्या कृतीतून ठरवत असतो"

सरु : हम्म्म.....तू पण ना.....खरंच वेडू आहेस.
काय करू मग मी आता? वाईट तरी कशी वागू?
अरे
झाडताना कधी मुंग्या दिसल्या ना तरी त्यांना धक्का
नाही लावत
रे...

प्रेम : ते पण खरेच आहे म्हणा....
"वाईट वागायला पण वाईट असावं लागतं"
तुझं मनच मुळात निर्मळ...मग तू बिचारी तू
तरी काय करणार?
पण..........
सोड,जाऊ दे.आहे तशीच वाग....
"गोड पाण्याच्या नदीमुळे समुद्र
कशी ना कधी गोड होइलच....."

सरू : (गालातल्या गालात हसली.)

प्रेम : ये चांगलं वाग सांगितलं ना....?????
तू पण खूप दुष्ट आहेस हा.....काही चांगली वगैरे
नाहीयेयस...

सरु :(चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह) ???????

प्रेम : "अशी हसत नको जाउस.....
तुझं हसणं वेड लावतं मला."
पुन्हा ती तशीच वाईट वागली.....
पुन्हा तशीच गालातल्या गालात लाजली.

स्वलिखित - Prem Mandale (Alone Kils)

Add Me Facebook :: https://m.facebook.com/alonekils1?refid=17&ref

Marathi Kavita : मराठी कविता


जयमाला

  • Guest
पुन्हा ती तशीच वाईट वागली


असे वाईट्ट अगदी सरुबाला.