Author Topic: माझ्यावरही कुणीतरी कविता करावी….  (Read 856 times)

Offline शितल

 • Jr. Member
 • **
 • Posts: 137
 • Gender: Female
 • हळुवार जपल्या त्या भावना….
माझ्यावर कुणीतरी कविता करावी
नजरेशी खेळत, डोळ्यांमध्ये बघत
केसांना हलकेच कुरवाळून शेवट करावी
माझ्यावरही कुणीतरी कविता करावी…

थोडा स्वभाव वर्णून, थोड्या खोड्या लिहून
प्रेमाने लेखणीतून उतरवावी
माझ्यावरही कुणीतरी कविता करावी…

थोडे सोबतीतले क्षण, थोडे विरहातील दडपण,
सुखः-दुखः साठवुन  करावी
माझ्यावरही कुणीतरी कविता करावी…

कधी हसताना बघुन, थोडंस आठवणीत रडून,
एकटेपणातील सजणी होईल अशी करावी
माझ्यावरही कुणीतरी कविता करावी…

स्तुतीमध्ये उगाच वाढवून, चंद्र-चांदणीची उपमा घालून
स्वप्नातल्या जगात लिहावी
माझ्यावरही कुणीतरी कविता करावी…


शितल……
 

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Prem Mandale

 • Jr. Member
 • **
 • Posts: 136
 • Gender: Male
 • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
Khup Chan  :)


Me Karu Ka Kavita  :P

Offline शितल

 • Jr. Member
 • **
 • Posts: 137
 • Gender: Female
 • हळुवार जपल्या त्या भावना….
N pahtahi kavita karta yete...... try karun baga....

Offline Prem Mandale

 • Jr. Member
 • **
 • Posts: 136
 • Gender: Male
 • एक शापित प्रेम वेडा (Alone Kils)
Ho mang ka Nahi Yenar :)

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दोन अधिक पाच किती ? (answer in English number):