Author Topic: अचानक एक कविता हसली....  (Read 894 times)

Offline manishshinde

  • Newbie
  • *
  • Posts: 5
अचानक एक कविता हसली....
« on: May 14, 2015, 05:18:57 PM »
 :D
अचानक एक कविता हसली ,
किती रे वेडा  तू म्हणाली ,
शब्दांचा लपंडाव तुला किती रे छान  जमतो,
कवितेतला यमक तुझ्या ,
मनात घर करून जातो ,
तुझ्या पेन्सिलची शाही पण,
तुझ्या विचारांवर आता जगतेय ,
तुला नवीन काही सुचतंय का?
याची वाट पाहतेय ,
अलगद तुझे विचार तू ,
माझ्या माध्यमाने लोकांसमोर मांडतोस ,
जुने ऋणानुबंध नव्याने पुन्हा ,
ताजे करून लिहितोस ,
मला आठवतेय ,
खाडाखोड  तुझ्या पहिल्या कवितेतली ,
थोडीशी छोटी , तुझ्या नवीन घरावर  ,
तू कविता केलेली…


 आता तुला कविता सहजच सुचते ,
प्रेमाने तर लिहितोसच  तु ,
तुझ्या प्रेमात मी पण जरावेळ न्हाहुन  निघते ,
तुझ्या कवितेतील "ती" मला जास्त भावते ,
तिच्यासाठीच करतो ना रे तू कविता ,
पण तिच्या पर्यंत खरच का तुझी कविता पोहोचते ?…

 मी हसलो उगाच ,
मी हसलो उगाच ,
म्हणालो ,
तिच्या पर्यंत पोहोचते कि नाही ,
ते माहित नाही ,
पण तुझ्या पर्यंत पोहोचली ,
याचाही वाईट वाटल नाही ,
कारण तुझ्याच मुळे  ओळख झाली होती दोन जीवांची ,
माफ कर पण  आता मला,
पूर्वी सारख्या प्रेम कविता करण नाही जमत मला ,
आता फक्त विरह आणि विरहाची आसवं  माझ्या मनाला …
 
हे सगळ ऐकत असतांना ,
माझ्या हसऱ्या  कवितेचा चेहरा स्तब्द झाला होता ,
कारण माझ्या आत्ताच्या कवितेचा ,
सारांश तिला नीट  कळला होता ,
समाजत  होत तिला ,
"ती"लाच रेखाटणारा कवी ,
आज जरा काही वेगळाच भासत होता ,
भास कुठला म्हणा हा ?
असा प्रश्न तिच्यासमोर तराळला होता …

 का? काय झाल ? विचारात पुढे ,
माझी कविता म्हणाली ,
पुन्हा नव्याने लिह ना  तू ,
अस हलक्याच आवाजात पुटपुटली  ,
जून सार नको आठवूस माझ्या माध्यमाने ,
पुन्हा  भावना मांड  तुझ्या लेखणीने ,
सुचेल तुला पुन्हा प्रेम कविता ,
Try  तर कर पुन्हा तुझ्या वेड्या मनाने ,
"ती"च्या वर नाही,  निदान माझ्यावर तरी प्रेम कर ,
"ती"च्यासाठी नाही,  निदान माझ्यासाठी तरी एक प्रेम कविता write  कर …
"ती"च्यासाठी नाही,  निदान माझ्यासाठी तरी एक प्रेम कविता write  कर …रंगकवी :- मनिष शिंदे…

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,417
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: अचानक एक कविता हसली....
« Reply #1 on: May 15, 2015, 10:44:45 AM »
nice....keep it up... :)