Author Topic: आधार माउलीचा  (Read 553 times)

Offline Rajesh khakre

  • Jr. Member
  • **
  • Posts: 167
आधार माउलीचा
« on: May 16, 2015, 10:19:16 AM »
आधार माउलीचा
सर्वांहुनि तो गोड
नाही जगती तियाच्या
प्रेमाला ती तोड़

आईच्या प्रेमाची ती
सर कुणाला ना येई
सगळी असंख्य नाती
अन् एकीकडे आई

आई म्हणजे आई
जणू देवाची सावली
तिच्यासारखे दैवत
या जगतात नाही

वाटो कुणा जरी हेवा
मज वाटते पुण्याई
प्रिय वाटते सदा ती
एक माझी आई
--- राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com


Marathi Kavita : मराठी कविता