Author Topic: म्हणून म्हणते पडायचं नाही कधी या प्रेमातं……  (Read 1412 times)

Offline शितल

  • Jr. Member
  • **
  • Posts: 137
  • Gender: Female
  • हळुवार जपल्या त्या भावना….

कवितेने आज माझी अशी मजा घेतली
शब्द पुढे जाईना ती अर्धवटच राहीली
म्हणाली मला, आता आठवणारचं नाही
त्याला विसरल्याशिवाय शब्द फुटणारच नाही

आठवण आली त्याची कि कोसळून रडतेस
आठवणीत त्याच्या मग मला उतरवतेस
आता काही केल्या मी उमगणारच नाही
त्याला विसरल्याशिवाय शब्द फुटणारच नाही

समजूत तिची काढून म्हणाली तिला मी
असं नको करू माझं तुझ्याविना कोणी नाही
मी हसते तुझ्यात आणि रडते तुझ्यात
हृदयातील माझ्या सर्व सांडते तुझ्यात

तु हि अशी रागावली तर बोलू मी कोणाशी
तो हि नाही तु हि नाही गुज सांगू मी कोणाशी
थोडी हसली पटकन सुचली बोल्ली ती कानात   
म्हणून म्हणते पडायचं नाही कधी या प्रेमातं


शितल……
« Last Edit: May 27, 2015, 11:25:40 AM by शितल »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline शितल

  • Jr. Member
  • **
  • Posts: 137
  • Gender: Female
  • हळुवार जपल्या त्या भावना….

कवितेने आज माझी अशी मजा घेतली
शब्द पुढे जाईना ती अर्धवटच राहीली
म्हणाली मला, आता आठवणारचं नाही
त्याला विसरल्याशिवाय शब्द फुटणारच नाही

आठवण आली त्याची कि कोसळून रडतेस
आठवणीत त्याच्या मग मला उतरवतेस
आता काही केल्या मी उमगणारच नाही
त्याला विसरल्याशिवाय शब्द फुटणारच नाही

समजूत तिची काढून म्हणाली तिला मी
असं नको करू माझं तुझ्याविना कोणी नाही
मी हसते तुझ्यात आणि रडते तुझ्यात
हृदयातील माझ्या सर्व सांडते तुझ्यात

तु हि अशी रागावली तर बोलू मी कोणाशी
तो हि नाही तु हि नाही गुज सांगू मी कोणाशी
थोडी हसली पटकन सुचली बोल्ली ती कानात   
म्हणून म्हणते पडायचं नाही कधी या प्रेमातं


शितल……