Author Topic: न जमलेली एक कविता…  (Read 1059 times)

Offline शितल

  • Jr. Member
  • **
  • Posts: 137
  • Gender: Female
  • हळुवार जपल्या त्या भावना….
न जमलेली एक कविता…
« on: May 17, 2015, 02:41:59 PM »

चार पुस्तकं वाचलीत म्हणजे
खूप शिकले असं नाही
शब्दांच्या चारोळ्या झाल्या म्हणजे
कविता करता आली असं नाही

भावनांचे बांध फुटून
शब्द वाहत होते
कोणीतरी न बोलता
हे सर्व पाहत होते

कुजबुजनाऱ्या गर्दीत
लिहिता येत नाही
एकांत वेंळी मात्र 
शब्दांना आवरता येत नाही

एकटी असते तेव्हा 
पोरकी आहे असं नाही
शब्दांच्या चारोळ्या झाल्या म्हणजे
कविता करता आली असं  नाही


शितल…

Marathi Kavita : मराठी कविता