Author Topic: आज त्या आयुष्यावर मी प्रेम कराया लागले …….  (Read 1318 times)

Offline शितल

 • Jr. Member
 • **
 • Posts: 137
 • Gender: Female
 • हळुवार जपल्या त्या भावना….
हरविलेल्या स्वप्नांत मी सापडाया लागले
थांबलेले हात कविता कराया लागले
भंगले का हृदय ज्यात प्रेम होते साठले ?
आज त्या हृदयावर मी प्रेम कराया लागले…

ऐकविते मी स्वताला आज माझे संगीतं
संपलेले स्वर होते कंठ होते दाटले
तडकले का ते मन ज्यात सूर होते साठले ?
आज त्या सुरांवर मी प्रेम कराया लागले…….

जाणते ते बोल जे काळजात टोचले
विझलेली स्वप्ने होती, प्रेम होते आटले
आठवणींत तुझ्या का आयुष्य काटले ?
आज त्या आयुष्यावर मी प्रेम कराया लागले …….


शितल ………
« Last Edit: May 21, 2015, 06:09:38 PM by शितल मस्के »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline शितल

 • Jr. Member
 • **
 • Posts: 137
 • Gender: Female
 • हळुवार जपल्या त्या भावना….

हरविलेल्या स्वप्नांत मी सापडाया लागले
थांबलेले हात कविता कराया लागले
भंगले का हृदय ज्यात प्रेम होते साठले ?
आज त्या हृदयावर मी प्रेम कराया लागले…

ऐकविते मी स्वताला आज माझे संगीतं
संपलेले स्वर होते कंठ होते दाटले
तडकले का ते मन ज्यात सूर होते साठले ?
आज त्या सुरांवर मी प्रेम कराया लागले…….

जाणते ते बोल जे काळजात टोचले
विझलेली स्वप्ने होती, प्रेम होते आटले
आठवणींत तुझ्या का आयुष्य काटले ?
आज त्या आयुष्यावर मी प्रेम कराया लागले …….


शितल ………

Offline Ganesh A Chandan

 • Newbie
 • *
 • Posts: 4
 • Gender: Male