नकळत तुझ्या तुला पाहते दुरुन
बोलण्याच्या प्रयत्नात जाते जवळून
शब्द फुटत नाही तुला समोर पाहून
हल्ली तुला कवितेत काढते उतरून ……
हृदयात तुझ्या थोडं प्रेम जागवून
घरटं बांधू दे थोडी जागा आडवून
नको जाऊ दूर जरा घेना समजुन
हल्ली तुला कवितेत काढते उतरून ……
विरहात तुझ्या येतो माझा ऊर भरून
लपविते डोळे घेते हुंदका आवरून
निगेटिव्ह तुझी आहे काळजात जपुन
हल्ली तुला कवितेत काढते उतरून ……
आठवणी माझ्या जर ठेव सांभाळून
रडशील जेव्हा जग जाईन सोडून
नशीब हे माझं लिहिलं प्रेम वगळुन
तरीसुद्धा कवितेत काढते उतरून ……
शितल ………