Author Topic: काय लळा लागला होता.....  (Read 804 times)

Offline महेश रा. केसरकर

 • Newbie
 • *
 • Posts: 18
 • Gender: Male
काय लळा लागला होता.....
« on: May 20, 2015, 10:47:16 PM »
गात होतो असाच एकदा, काय गळा लागला होता
मातीत खेळलो आपण, काय लळा लागला होता.....

दिवस ते मंतरलेले
तुझ्या सोबतचे लहानपणीचे
क्षणात रूसुनी जाण्याचे
अन् क्षणात एक होण्याचे

आठवला खेळ लपंडाव
आणि तो भातुकलीचा
आठवतो का सांग सखे
तो खेळ शिवपाठीचा

आठवूनी आपले खेळ सारे, गळा गाऊ लागला होता
मातीत खेळलो आपण, काय लळा लागला होता.....

नव्हती कोणाची भीती
ना कशाची बंधने
मी तुझा श्वास होतो
अन्  तु माझी स्पंदने

खुप समजावलं मनाला
की ती फक्त मैत्रीण होती
आयुष्यभराची साथ द्यायला
ती तुला बांधील नव्हती

मन वेड ऐकतच नव्हतं, गळा दाटू लागला होता
मातीत खेळलो आपण, काय लळा लागला होता.....

माहित होतं आहे प्रेम
तुझंही खुप माझ्यावर
बसलो होतो नजर लावून
एकटाच तुझ्या येण्यावर

तुझी आठवण आली नाही
असं कधी झालंच नाही
तुझ्याच साठी होतो कदाचित
दुसऱ्या वाटेला गेलोच नाही

चिंब आठवांत तुझ्या, जीव भिजू लागला होता
मातीत खेळलो आपण, काय लळा लागला होता.....

खात्री होती तु येशीलच
प्रेमासाठी सगळं विसरून
अन् एक दिवस तु आलीसच
माझ्यासाठी नं रहावून

मन वेडं आनंदून गेलं, गळा पुन्हा दाटू लागला होता
मातीत खेळलो आपण, काय लळा लागला होता.....

काय लळा लागला होता.....

महेश...

Marathi Kavita : मराठी कविता


Offline शितल

 • Jr. Member
 • **
 • Posts: 137
 • Gender: Female
 • हळुवार जपल्या त्या भावना….
Re: काय लळा लागला होता.....
« Reply #1 on: May 21, 2015, 05:53:01 PM »
sundar aahe......
lahanpanich prem kiti mast ast na......

Offline महेश रा. केसरकर

 • Newbie
 • *
 • Posts: 18
 • Gender: Male
Re: काय लळा लागला होता.....
« Reply #2 on: May 22, 2015, 11:13:32 AM »
Ho.. Khup god asatat tya athvani.. Thanx for comment.