Author Topic: तू म्हणायचीस .......पाउस वेडा आहे  (Read 869 times)

Offline Ganesh A Chandan

  • Newbie
  • *
  • Posts: 4
  • Gender: Male
आज पावसाचा थेंब अंगावर झेलताना
कसातरीच वाटतंय
मला आठवतो तो पाहीला पाउस

जेव्हा आपण दोघ
हातात हात घेवून
या पावसाच्य सारी झेलत होतो .
तेवा तो पाउस गप्प बसून
आपलं बोलणं चोरून ऐकायचा ..
आज मात्र तो खूप काही बोलतोय
आणि मी मात्र गुपचूप ऐकून घेतोय .....
पावसाच आणि माझ काहीतरी नात आहे नक्कीच ....
कारण जेव्हा जेव्हा पाउस पडतो
तेव्हा तेव्हा तो मला निशब्द करतो
आणि स्वताच ऐकायला लावतो
तू म्हणायचीस .......
...पाउस वेडा आहे .......
पण आता मात्र कळतंय मला तो पाउस कधीच वेडा नव्हता
.आपणच वेडे होतो
तू आता कुठे आहेस माहित नाही ......
हा पाऊस आता मला चिडवतोय कदाचित तुलाही चिडवत असेल
....
तुझ्या अंगावर पडणाऱ्या ...पावसाच्या सरी
आणि माझ्या अंगावर पडणाऱ्या सरी ..जरी वेगळ्या असल्या ....
तरी तो पाऊस मात्र एक आहे ......
पाऊस पडून गेल्यावर .......
झाडाखाली तू उभी राहायचीस .....
आणि मी फांदी हलवली कि .....
त्या टपोरया थेंबांचा सडा पडायचा .....
तुझ्यानी माझ्या अंगावर .....
तेवा तू शहरायचीस....
आणि हळूच बिलागायाचीस मला ....
तेवा मी त्या पावसाला किती तरी वेळा थंक्स (thanks ) म्हणालो असेन
असा हा पाऊस आंज मला .....
बेभान करून टाकतो .....
तुझ्या आठवणीत मात्र मला चिंब चिंब भिजवतो ......
बाहेर तो बरसात असतो आणि आत मी .....
तो आकाशातून बरसात असतो ....
आणि मी डोळ्यांतून ......
"माझ्या प्रियेच्या गावात .....
कसा पडतो पाऊस ....
सई झेलते पाऊस तिच्या गोर्या हातात .....
माझ्याविना आलेल्या सारीच स्वागत कस  करशील ..
ओंजळीत किती आणि हृदयात किती भरशील ...."
 
Ganesh A Chandanshive
7709078174
« Last Edit: May 22, 2015, 01:12:33 PM by Ganesh A Chandan »