Author Topic: उलट सुलट मुर्खासारख पानावर काहीतरी लिहित असते……  (Read 1071 times)

Offline शितल

  • Jr. Member
  • **
  • Posts: 137
  • Gender: Female
  • हळुवार जपल्या त्या भावना….

जरा कुठे मनाला लागले की लगेच हातात पेन घेते
उलट सुलट मुर्खासारख पानावर काहीतरी लिहित असते

शांत बसून, हळूच हसून शब्दांना जवळ घेते
अर्थ जुळवून मन वळवून चारोळ्या त्यांच्या बनवत असते

कधी रडव्या, कधी हसऱ्या परिस्थितीनुसार रचत असते
उलट सुलट मुर्खासारख पानावर काहीतरी लिहित असते

कल्पना करून, सत्याला धरून जड अंतकरणाने ठरवत असते
जाणूनबुजून तर कधी खोड्या करून पानांवर आग ओकत असते

कधी सर्व आठवून, कधी प्रेम साठवून
प्रेमाचा सागर भरत असते

भरलेल्या सागरातील शाई घेऊन
उलट सुलट मुर्खासारख पानावर काहीतरी लिहित असते…शितल…