Author Topic: जगायचंय मला……  (Read 1160 times)

Offline शितल

  • Jr. Member
  • **
  • Posts: 137
  • Gender: Female
  • हळुवार जपल्या त्या भावना….
जगायचंय मला……
« on: May 23, 2015, 03:32:17 PM »

उंच उंच आभाळात फिरायचं, पंखांमध्ये बळ  आणून उडायचं
प्रिय म्हणतात, जीवन खूप सुंदर आहे म्हणूनच पुन्हा जगायचंय मला……

नशिबाला जिंकून बघायचं, घरातल्यांना सुखी ठेवायचं
प्रिय म्हणतात, आई वडील सर्वस्व असतात त्यांच्यासाठी काहीतरी करायचंय मला…

तुझी अर्धांगीनी बनून मिरवायचय, जन्मोजन्मी तुलाच मागायचंय
सर्व म्हणतात, हे शक्य नाही पण फक्त तुझ्याचसाठी या सर्वांशी लढायचय मला…

तुझ्या वडिलांना पप्पा म्हणायचंय, एकदा तरी बापाचं प्रेम अनुभवायचंय
प्रिय म्हणतात, पप्पा रागीट आहेत तो राग शांत करण्यासाठी आपल्या घरी यायचंय मला…                                                                                                         
                                                                           पुन्हा जगायचं मला……

आईची समजूत काढायचीय, तिच्या मुलाला पदरात मागायचंय
प्रिय म्हणतात, आईला परजातीय नको पण मी परकी नाही हि सांगायचंय मला…

आपलं  स्वप्न खरं करायचंय, त्या स्वप्नांना सांभाळायचंय
प्रिय म्हणतात, तिचा स्वभाव माझ्यासारखा असावा या सोनेरी क्षणांसाठी खूप जगायचंय मला……

सगळ्याचं मन सांभाळायचय, सर्वांना सुखी ठेवायचंय
हे म्हणतात, I cant leave without you jaan......
हे ऐकण्यासाठी पुन्हा खूप खूप जगायचंय मला……   :) :) :)


शितल…

Marathi Kavita : मराठी कविता


तरला

  • Guest
Re: जगायचंय मला……
« Reply #1 on: May 25, 2015, 07:50:34 AM »
दोनतीन वर्षात होईल कोणाशीतरी लग्न
जाशील त्याला विसरून, होऊन संसारात मग्न