Author Topic: आठवणीत तुझ्या…….  (Read 1237 times)

Offline शितल

  • Jr. Member
  • **
  • Posts: 137
  • Gender: Female
  • हळुवार जपल्या त्या भावना….
आठवणीत तुझ्या…….
« on: May 23, 2015, 03:34:49 PM »

आठवणीत तुझ्या १४३ कविता लिहिल्या
खरं सांग एकदा त्यातील किती तुला कळल्या…

कधी भरविले पान, कधी फक्त चारोळ्या
खरं सांग एकदा त्यातील किती तुला कळल्या…

थोड्या हसत-हसत लिहिल्या
काही लिहताना झाल्या ओल्या
कधी एकसमान कधी थोड्या वेगळ्या

आठवणीत तुझ्या १४३ कविता लिहिल्या
खरं सांग एकदा त्यातील किती तुला कळल्या…

कधी विरहाच्या कधी सोबतीतल्या
कधी विचारले प्रश्न कधी उत्तरातल्या
थोड्या रागामध्ये लिहिल्या थोड्या अपेक्षा वाढलेल्या

आठवणीत तुझ्या १४३ कविता लिहिल्या
खरं सांग एकदा त्यातील किती तुला कळल्या…


शितल……

Marathi Kavita : मराठी कविता


navnath kalhatkar

  • Guest
Re: आठवणीत तुझ्या…….
« Reply #1 on: May 24, 2015, 01:48:16 PM »
Very emotional