Author Topic: फक्त आठवणींत?..........  (Read 684 times)

Offline शितल

  • Jr. Member
  • **
  • Posts: 137
  • Gender: Female
  • हळुवार जपल्या त्या भावना….
फक्त आठवणींत?..........
« on: May 24, 2015, 03:15:49 PM »
आईच्या कुशीत कधी
वडिलांच्या मिठीत
होईल हे सत्यात
का राहील फक्त आठवणींत?

गार गुलाबी थंडीत
कधी पावसांच्या सरीत
भेटेल तो मला
का येईल फक्त आठवणींत?

प्रेमाच्या झोपडीत
कधी आभाळाच्या छत्रीत
सांभाळेल तो मला
का जाणवेल फक्त आठवणींत?


शितल…

Marathi Kavita : मराठी कविता