कल्पनेत माझ्या तूच आहेस,
जीवनात एकदा तरी येशील का ?
स्वप्नामधून निघून माझ्या,
गीतांतून फुलशील का?
स्वप्ना माझे अबोल आहे,
अबोल आहे माझी प्रीती.
या अबोल प्रीतीला,
एकदा तरी बोलक करशील का?
स्वप्नामधून निघून माझ्या,
गीतांतून फुलशील का?
मनात माझ्या विचार तुझे,
डोळ्यात माझ्या स्वप्न तुझे.
हृदयात फक्त तुझीच प्रतिमा,
असाच हृदयात राहशील का?
स्वप्नामधून निघून माझ्या,
गीतांतून फुलशील का?
स्वप्नामधून निगुन एकदा,
हात प्रीतीचा देशील का?
दिली आहे हृदयापासून हाक,
साद मला देशील का?
स्वप्नामधून निघून माझ्या,
गीतांतून फुलशील का?
कवितेच्या चार ओळीत मी,
मन माझे प्रतिबिंबित केले.
पण हे शब्द माझे,
तुझ्यापर्यंत पोहचतील का?
स्वप्नामधून निघून माझ्या,
गीतांतून फुलशील का?
कोण तू ? कसा आहेस?
एकदा तरी सांगशील का?
स्वप्नामधून निघून माझ्या ,
गीतांतून फुलशील का?
स्वप्नामधून निघून माझ्या ,
गीतांतून फुलशील का?
unknown