तूच संग बर देवा आता,
कस ह्या जगात जगायचं ?
स्वार्थी असणाऱ्या या सोंगत्यांना,
कसा बर आपल म्हणायचं ?
आई-बापाने पोराला,
शिकायला शाळेमध्ये पाठवायचं.
पण पोराने मात्र लेक्चर बडवून,
कट्ट्यावर बसायचं.
एखाद लेक्चर केल तर केल,
नाही तर कॉलेज भर हिंडायचं.
येणाऱ्या जाणार्या पोरींना,
कट्ट्यावर बसून न्याहालायाच.
एखादी पटलीच त्यातली तर,
तिच्यामाग हिंडायचं.
तिला पाहण्यासाठी मग,
लेक्चर देखील करायचं.
सार्या लेक्चर भर मग,
तिलाच न्याहाळत बसायचं.
मजनू सारखा मग सारख,
तिच्या मग मग फिरायचं.
कस तरी करून मग
तिच्याशी सुत जुलावायाच.
तिच्या बरोबर हिंडायचं , फिरायचं,
हॉटेलिंग देखील करायचं .
असाच एखाद्या दिवशी,
तिची वाट बघत कट्ट्यावर बसायचं .
तिच्या पेक्षा जास्त सुंदर मुलगी दिसली कि मग,
तिला विसरायचं अन दुसरीला पटवायचं .
तिच्या देखील प्रेमात याने मजनू व्हायचं,
तूच संग बर देवा आता ,
याला कसा बर खर प्रेम म्हणायचं ?