Author Topic: -- प्रेममंथन --  (Read 695 times)

Offline SHASHIKANT SHANDILE

  • Jr. Member
  • **
  • Posts: 349
  • Gender: Male
  • शशिकांत शांडिले, नागपुर
-- प्रेममंथन --
« on: May 30, 2015, 12:24:16 PM »
कट्तां न कटे हा जीवन
अवघड जीवन प्रत्येक क्षण
जरी व्याकुळ अंतर्मन
करतोय या प्रेमाचे जतन
म्हणूनच 
केले हृदयी हे प्रेममंथन

नजानता बांधिल हृदयाशी
बघता रूप ते साधेपण
आठ्गीत येता तू आजही
भरून येतो अधीर मन
म्हणूनच 
केले हृदयी हे प्रेममंथन

मंथनात समजून हे आले
फक्त विरह भाग्य मिळाले
आसवात जगण्याला आता
मन हे हसता सज्ज झाले
म्हणूनच 
केले हृदयी हे प्रेममंथन

शशिकांत शांडीले (SD), नागपूर
Mo. ९९७५९९५४५०
Its Just My Word's

शब्द माझे!

Marathi Kavita : मराठी कविता