Author Topic: °•°•°•°•प्रेमप्रतिक्षा•°•°•°•°  (Read 934 times)

Offline Rohan Rajendra Bhosale

  • Newbie
  • *
  • Posts: 12
आज प्रेम आले तिच्यावरी
मिठीत घ्यावे वाटले तिला,
वेळ निघुन गेली होती
देवाने मागीतले होते तिला.

कसा हा आयुष्याचा खेळ
सोसवेना आता ऐकट्यला,
नाही राहीली ती ह्या जगात
समजावु कसे ह्या मनाला.

ती नसल्याने मन माझे
कासावीस होवुन ऊठते,
ती येईल का परत कधी
"प्रेमप्रतिक्षा" ही अवघडते.

मागीतला होता हात तिचा
देऊन गेली हि शिक्षा,
जाता जाता सांगुन गेली
कर थोडी प्रेमाची प्रतिक्षा

म्हणुन करतोय "प्रेमप्रतिक्षा"

कवी - रोहन राजेंद्र भोसले.
८१०८९१९२३४
« Last Edit: July 02, 2016, 12:53:22 PM by Rohan Rajendra Bhosle »