Author Topic: फक्त तुझ्यासाठी....  (Read 1780 times)

Offline sammadival

  • Jr. Member
  • **
  • Posts: 75
  • Gender: Male
  • somnath madival
फक्त तुझ्यासाठी....
« on: June 02, 2015, 06:00:46 PM »
खूप प्रेम करतो तुझ्यावर,
सत्य हे जाणून बघ,
एकदा तरी मला तू,
आपले मानून बघ. वाट्टेल ते करेन तुझ्यासाठी, तू फक्त सांगून बघ,
आयुष्भर साथ देईन तुझी,
एकदा आपले करून बघ.
तुझ्यासाठीच जगत आहे,
तुझ्यावरच मरत आहे,
असला जरी नकार तुझा, तरी तुझ्या होकाराची वाट बघत आहे. वाटलेच कधी तुला तर,
बघ प्रेम माझे तपासून,
पण मी खरंच खूप प्रेम करतो,
तुझ्यावर अगदी मनापासून.....!!
घडलेल्या गोष्टी मागे ठेऊन
जरा जगून बघ माझ्यासाठी, माझे प्रेम हे नेहमी असेच राहीन,
मनापासून..... फक्त तुझ्यासाठी....

सोम मडिवाल
पुणे अप्पर
9762282827

Marathi Kavita : मराठी कविता