Author Topic: मिठीत मला थोडं घेशील का ?  (Read 2158 times)

Offline शितल

 • Jr. Member
 • **
 • Posts: 137
 • Gender: Female
 • हळुवार जपल्या त्या भावना….
सोसल्या ज्या विरहाच्या यातना,
तू ही थोड्या अनुभवशील का ?
मलम लावण्या त्या जखमांना,
मिठीत मला थोडं घेशील का ?

भिजलेले किती रात्र-दिवस ते
तू ही आठवणींत थोडं रडशील का ?
पुसून आसवे माझ्या डोळ्यांतील
मिठीत मला थोडं घेशील का ?

आठवणींतले सुंदर क्षण ते,
तू ही थोडं त्यात रमशील का ?
देऊन कबुली प्रेमाची स्वताच्या
मिठीत तुझ्या अलगद घेशील का ?
 :( :( :(

शितल ……
« Last Edit: June 04, 2015, 06:29:24 PM by शितल »

Marathi Kavita : मराठी कविता


Hreeteish

 • Guest
Re: मिठीत मला थोडं घेशील का ?
« Reply #1 on: June 05, 2015, 09:48:29 AM »
Khup sunder rachana ahe agadi tumchyasarkhi

Offline शितल

 • Jr. Member
 • **
 • Posts: 137
 • Gender: Female
 • हळुवार जपल्या त्या भावना….
Re: मिठीत मला थोडं घेशील का ?
« Reply #2 on: June 06, 2015, 03:33:06 PM »
aabhari aahe........... :-X