Author Topic: काळीज चोरीला गेलं.........  (Read 1210 times)

Offline शितल

  • Jr. Member
  • **
  • Posts: 137
  • Gender: Female
  • हळुवार जपल्या त्या भावना….
काळीज चोरीला गेलं.........
« on: June 07, 2015, 04:20:25 PM »
एकुलतं एक होतं
पिंजऱ्यात ठेवलेलं
कुणास ठाऊक कधी माझं
काळीज चोरीला गेलं

गरीब बिचारं काळीज माझं
वाली वाचून हरवलं
कुणास ठाऊक कधी माझं
काळीज चोरीला गेलं

जरा वेळ धडधडलं
अचानक बंद पडलं
झाले काय त्याला म्हणून
असंच बघायचं ठरवलं
भूक उडाली, झोप उडाली
तेव्हा काय ते समजलं

कधी नव्हे ते आज अचानक
काळीज चोरीला गेलं ……


शितल ………

Marathi Kavita : मराठी कविता