Author Topic: -- अबोलं प्रेम --  (Read 1758 times)

Offline SHASHIKANT SHANDILE

  • Jr. Member
  • **
  • Posts: 370
  • Gender: Male
  • शशिकांत शांडिले, नागपुर
-- अबोलं प्रेम --
« on: June 08, 2015, 04:57:03 PM »
ओठांवर ओठ टेकलेले
श्वासात श्वास बांधलेले
आता मोकळे कसे करावे
मनी भावना गुंतलेले

अबोलेच प्रेमाचे वारे
शब्दांनाहि विचार आले
लिहिता न सुझे शब्द
प्रश्नांवरच प्रश्न उभे झाले

दुख सहायचं तो मी
विरह सोसायचं तो मी
कळेना भावना माझ्या
प्रेम करणारा गं तो मी

तुला वाचता न आले
शब्द या डोळ्यातले
तुला गमवून साजणी
जगणार मी हे जगणे

बोललोही मी मनाचे 
तुला आभास न झाले
वोठांवर आले शब्द तुला
बघताच निशब्द झाले
बघताच निशब्द झाले

शशिकांत शांडीले (SD), नागपूर
Mo. ९९७५९९५४५०
Its Just My Word's

शब्द माझे!

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sachinikam

  • Jr. Member
  • **
  • Posts: 183
  • Gender: Male
Re: -- अबोलं प्रेम --
« Reply #1 on: June 10, 2015, 09:37:10 AM »
Chan!