Author Topic: -- प्रेमपिडा --  (Read 749 times)

Offline SHASHIKANT SHANDILE

  • Jr. Member
  • **
  • Posts: 349
  • Gender: Male
  • शशिकांत शांडिले, नागपुर
-- प्रेमपिडा --
« on: June 12, 2015, 04:56:19 PM »
आसवांतून झळझळली
आठवणी धारा
आठवताच तडफडली
व्याकुळती कळा

व्याकुळ हृदयात दाटली
असहनीय पिडा
तुझ्यासंगतीचा स्वप्न
आजही अपुरा

एकतर्फी माझी कहाणी
दम टाकू लागली
माझ्या विचारांवरच नवी
विचार पडू लागली

विश्वास करून जीवनाचा
विश्वासघात होतो
जीवापाड केल्या प्रेमाचा
कसा खेळ होतो

तुटली आता बांधलेली
तुझ्या परतीची आशा
तुझ्या माथी सजलेल्या 
कुंकवावर नांव दुसऱ्याचा

तुझ्या माथी सजलेल्या   
कुंकवावर नांव दुसऱ्याचा

शशिकांत शांडीले (SD), नागपूर
Mo. ९९७५९९५४५०
Its Just My Word's

शब्द माझे!

Marathi Kavita : मराठी कविता