Author Topic: स्वप्नांची घरे, त्यांना डोळ्यांचे दार  (Read 685 times)

Offline AKSHAY BHALGAT

  • Newbie
  • *
  • Posts: 18
स्वप्नांची घरे, त्यांना डोळ्यांचे दार
तुझ्याच आठवणींनी , त्यांना सजवलय फार

मिटता डोळे  दिसते …, तूच सगळी कडे .,
उघडता क्षणी होतो ., सर्वत्र अंधार …
स्वप्नांची घरे, त्यांना डोळ्यांचे दार

निजता अंथरुणी … ऊब तुझीच भासते …,
घट्ट कवटाळता उशी ., झोप लागते गाढ ….
स्वप्नांची घरे, त्यांना डोळ्यांचे दार

पाऊला - पाऊला वर होतो., भास तुझा चोहीकडे
स्पर्श करता तुज ., मन हि होते बेजार ….!
स्वप्नांची घरे, त्यांना डोळ्यांचे दार

हलक्या - हलक्या बोलांची ,
आखीव सुंदर चारोळ्या .,
सांगड तुझ्या आठवणींशी ,
घाले कवितेच्या ओल्या .,
तुझ्या मोजक्या क्षणांशी .,
हितगुज होते फार …।
स्वप्नांची घरे, त्यांना डोळ्यांचे दार

अक्षय भळगट
१५.०६.२०१५