अस वाटत चंद्र बनाव,
त्याच्या सुंदर किरणानी तुला आपल्या मिठीत घ्याव...
अस वाटत गुलाबाचे काटे स्वताला बनवाव,
आणि रोज तुझ रक्षण कराव...
अस वाटत तलावात चिखल म्हणून रहाव,
आणि कमला सारख प्रेमाने तुला जपाव...
असा वाटत पणतीत तेल म्हणून रहाव,
सतत तुझे उजळपण मला दिसाव...
प्रेम कशाला म्हणतात नसेल माहीत मला,
तुझ्या मनात मे असुदे एवढच वाटत....
-- समीर प्रकाश कदम