Author Topic: -- तू असतीस तर --  (Read 1158 times)

Offline SHASHIKANT SHANDILE

  • Jr. Member
  • **
  • Posts: 356
  • Gender: Male
  • शशिकांत शांडिले, नागपुर
-- तू असतीस तर --
« on: June 20, 2015, 11:25:25 AM »
तू असतीस तर
झाले असते दूर क्षण एकांताचे
तू असतीस तर

नाही दिसलं कुणी असं काहीच नाही
तुझविन मनाला कुणी जचलंच नाही
टाईमपास करत कुणाला ते छळणं
आजकालचं प्रेम मला जमलंच नाही

तू असतीस तर
झाले असते सौभाग हे अभागाचे
तू असतीस तर

आज जगतोय मी विरहात रडतांना
समाधान आहे तुला हसत बघतांना 
निभावतोय मी एकतर्फी प्रेम माझे
हो दुखही होते कधी तू दूर असतांना 

तू असतीस तर
झाले असते हसणे कधी सुखाचे
तू असतीस तर

तू कुठे व कशी आहे हेही माहित नाही
प्रेमाची हि कोणती नीती ते माहित नाही
तू सुखी आहे जगतोय फक्त या आशेवर
काय होईल जीवनाचं तेही माहित नाही

तू असतीस तर
झाले असते फेडणे या जीवनाचे
तू असतीस तर

वाटून घेऊ नको विसरेन म्हणून तुला
अगं देहातला श्वास मानलंय मी तुला
तुला विसरून क्षणभरही जगणार नाही 
सोडून देईल जगण्याचं विसरताच तुला

तू असतीस तर
झाले असते सार्थक या जीवनाचे
तू असतीस तर

शशिकांत शांडीले (SD), नागपूर
Mo. ९९७५९९५४५०
Its Just My Word's

शब्द माझे!

Marathi Kavita : मराठी कविता